| माणगाव | प्रतिनिधी |
जे.बी. सावंत एज्युकेशन सोसायटीचे टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज माणगाव येथे शुक्रवार, दि. 18 जुलै रोजी शैक्षाणिक वर्ष 2025-26 करिता प्रथम वर्ष बीकॉममध्ये प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेतर्फे केक कापून व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव नानासाहेब सावंत यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नानासाहेब सावंत यांनी प्रथम वर्ष बीकॉममध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व नवोदित विद्यार्थ्यांचे आपल्या मनोगतातून सुरुवातीलाच संस्थेतर्फे स्वागत केले. ते पुढे म्हणाले, मुलांनो नेहमी कॉलेजला या, खूप अभ्यास करा, मोठे व्हा, चांगल्या पदावर नोकरीला लागा. आपल्या आई-वडिलांचे स्वप्न असते की, आपल्या मुलांनी खूप शिकून मोठे होऊन चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावे. आई-वडिलांचे हे स्वप्न साकारण्यासाठी त्यांची मेहनत लक्षात घेऊन मुलांनी खूप अभ्यास करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे सदस्य रामदास पुराणिक, प्रा. अशोक मोरे, डॉ. नितीन मुटकुळे, प्रा. जगदीश शिगवण, ग्रंथपाल अमित बाकाडे, प्रा. भारत पवार, प्रा. सायगावकर, मुख्य लिपिक दिलीप ढेपे, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष बीकॉमची विद्यार्थिनी अनिषा शिंदे यांनी करून प्रा. अशोक मोरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.







