| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याची आघाडीची पतसंस्था म्हणून माथेरान नागरी पतसंस्था ओळखली जाते. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने आपल्या संस्थेतील भागधारक आणि सभासद यांना अधिक योजना देण्यासाठी राज्यात प्रगतीपथावर असलेल्या अनेक पाटणसाठा आणि क्रेडिट सोसायटी यांच्या गाठीभेटी घेऊन अभ्यास सुरु केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन पतसंस्था आणि क्रेडिट सोसायट्या यांच्या भेटी घेऊन त्या संस्थांच्या कामकाजाची माहिती घेतली.
या अभ्यास दौर्यामध्ये माथेरान नागरी पतसंस्थेचे सभापती अजय सावंत तसेच, संचालक विजय कदम, कुलदीप जाधव, रामचंद्र ढेबे, गजानन आबनावें, निसार शारवान, विजय सावंत, नितीन शेळके, चंद्रकांत काळे, तज्ञ संचालक गिरीश पवार ,अनिल गायकवाड यांच्यासह पतसंस्थेत पिग्मी संकलनात सहभाग घेणारे एजंट देवानंद कदम, संतोष शिंदे आणि संस्थेचे सचिव योगेश जाधव हे सहभागी झाले होते.