स्टंट बेतला जीवावर; तरुणाचा जागीच मृत्यू

। मुंबई । प्रतिनिधी ।

भाईंदर येथे एका तरुणाचा सायकल स्टंट करत असताना भिंतीवर आदळून मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये उतार असलेल्या रस्त्यावरून एक तरुण सायकल स्टंट करण्याच्या हिशोबाने येतो. मात्र, त्याचा अंदाज चुकल्याने तो पुढे जाऊन भिंतीला जोरदार आदळला. यात त्याचे डोके भिंतीवर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मृत तरुण हा काशिमिरा लगत असलेल्या घोडबंदर किल्ल्यावर पर्यटनासाठी आला होता.

Exit mobile version