। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील तमाम भक्तांचे श्रध्दास्थान गुरुवर्य सुभानराव तथा आण्णा राणे यांचा (42) वा पुण्यतिथी सोहळा आयोजित केला आहे. शनिवारी (दि. 27) पेझारी येथील दत्त मंदिर सभागृहात हा सोहळा होणार आहे. या निमित्त सकाळी पाच वाजल्यापासून सायंकाळपर्यंत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी खासदार अरविंद सावंत, माजी आ. पंडित पाटील, शेकाप नेते शंकरराव म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, सखाराम पवार, सुमना पाटील, सुप्रभात पाटील, संजिव पंतबाळेकुंद्री, रंजन पंतबाळेकुंद्री, राजीव पंतबाळेकुंद्री, डॉ. संजय पंतबाळेकुंद्री, अभिजीत पंतबाळेकुंद्री, महादेवबुवा शहाबाजकर, पंडित अरुणबुवा कारेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास श्रींची पुजा, अभिषेक व दत्तात्रेय सहस्त्रनामावली, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ध्वजारोहण व महाआरती, सकाळी नऊ वाजता गुणवंत विद्यार्थी गुणगौरव आणि गुरूवर्य सुभानराव राणे सन्मान सोहळा, दुपारी एक वाजता भजनरत्न महादेवबुवा शहाबाजकर, गंधर्व कोळी, मीनल पाटील, अशोकबुवा पाटील, अरुणबुवा कारेकर यांचे भजन असणार आहे. यावेळी पखवाज व तबला वादक दर्शन नाईक, गौरव म्हात्रे यांची साथ असणार आहे. सायंकाळी चार वाजता, श्रीपंत बोधपीठ अंतर्गत डॉ. संजय भगत यांचे किर्तन तसेच सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विविध पंतभक्त मंडळांची भजने होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.