| पाताळगंगा | वार्ताहर |
खालापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष म्हात्रे यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेत त्यास आलिबाग पोलीस ग्राऊंड येथे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले. गेली अनेक वर्षे पोलीस खात्यात काम करीत असताना आजवर पाली, रसायनी तसेच आता खालापूर पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर त्यांचा जनसंपर्क उत्तम असून, त्यांनी केलेले कार्य उल्लेखनिय असल्याचे प्रतिपादन पोलीस महासंचालक पदक प्रदान करताना आपल्या मनोगतात उपस्थित पोलीस अधिकारी यांनी व्यक्त केले.