| चिरनेर | प्रतिनिधी ।
तायक्वॉन्डो फेडरेशन ऑफ इंडिया व तायक्वॉन्डो असोसिएशन ऑफ उत्तराखंड या अधिकृत संघटने मार्फत इनडोअर स्टेडियम विदिशा मध्य प्रदेश येथे 8 ते 10 मे 2026 राष्ट्रीय पंच सेमिनार व राष्ट्रीय पंच परीक्षा होणार आहे. या होणाऱ्या तायक्वांदो परीक्षासाठी परीक्षक म्हणुन रायगडचे सुपूत्र तायक्वांदो आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक तसेच कॉमनवेल्थ तायक्वांदो रेफरी युनियनचे सदस्य सुभाष पाटील यांची निवड झाली आहे. सुभाष पाटील हे 7 वी डिग्री ब्लॅक बेल्ट व आंतरराष्ट्रीय पंच आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पंच म्हणुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी अनेक देशात जाऊन सेमिनार केले आहेत. ते प्रथम श्रेणीचे आंतरराष्ट्रीय पंच आहेत. आंतरराष्ट्रीय ज्युनियर तायक्वांदो स्पर्धा दक्षिण कोरिया 2004 भारतीय संघाचे कोच, पंच पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2010 भारत, पंच कॉमनवेल्थ स्पर्धा 2011 आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा दक्षिण कोरिया 2011 भारतीय संघाचे कोच, पंच 11 वी इजराइल ओपन तायक्वांदो स्पर्धा 2013 पंच 8 वी स्कॉटिश ओपन स्पर्धा 2013 स्कॉटलंड, संघ प्रमुख कोरिया ओपन 2014, आंतरराष्ट्रीय साफ गेम 2016, लुसोफोतीया तायक्वांदो स्पर्धा नियंत्रक 2014 गोवा, कॅनडा ओपन व पैरा ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप 2017 पंच 2023 वर्ल्ड तायक्वांदो प्रेसिडंट कप व ओशियाना पॅरा व ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा तसेच आतापर्यंत अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन सुभाष पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गोवा नॅशनल गेम 2023 व नॅशनल गेम उत्तराखंड 2025 स्पर्धेसाठी सुभाष पाटील यांची पंच प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. ते 7 मे 2026 रोजी विदेशा मध्य प्रदेश येथे रवाना होणार आहेत.
सुभाष पाटील यांची परीक्षक म्हणून नियुक्ती
