सुभाष वाणी यांनी स्वीकारला गट विकास अधिकारी पदाचा कार्यभार

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड पंचायतसमितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुभाष वाणी याना मुरुड पंचायतसमितीचे गट विकास अधिकारी म्हणून कार्यभार जिल्हा परिषदेकडून देण्यात आला आहे. आज पंचायत समितीच्या सर्व उपस्थितांसमोर वाणी यांनी गट विकास अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल सर्व कर्मचारी वृंदांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. येथे कार्यरत असणारे गट विकास अधिकारी अनिकेत पाटील हे एक महिन्याच्या दीर्घकालीन सुट्टीवर गेल्याने या पदाचा कार्यभार ग्रामपंचायत विस्तार अधिकारी वाणी यांच्याकडे देण्यात आला आहे.
सर्व कर्मचारी वृंदाना सोबत घेऊन मुरुड पंचायत समितीची कामे मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन यावेळी वाणी यांनी केले आहे.सदरील कार्यक्रमासाठी कक्ष अधिकारी ,वानखेडे, सचिन मुनेश्‍वर, संजय शेडगे, पी. पी. सावंत, जे.आर. म्हात्रे, सुशांत ठाकूर, सी. ए. मगर, व्ही. आर. माळी, एस. पी. नागोठ्कर उपस्थित होते

Exit mobile version