गणेशभक्तांकडून खरेदीसाठी गर्दी
| पाताळगंगा | वार्ताहर |
गणेशोत्सवामध्ये ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये या सणाच्या दिवशी केळीच्या पानामध्ये पंचपक्वान्न खाल्ले जाते. परंतु, केळीचे पान दुर्मिळ असून, शिवाय ती महाग विकली जातात. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून पावसाळ्यात डोंगराच्या कुशीत केळीसारखी दिसणारी कर्दळीच्या पानांचा पर्याय म्हणून खोपोली, चौक, मोहपाडा बाजारपेठेत विक्रीस येत आहेत. कर्दळीचे पान हे थंड असल्यामुळे अन्न पचनास सोपे जात असते. गणपती घरी असल्यामुळे आपले नातेवाईक, मित्रमंडळी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. शिवाय, उत्सव म्हटले की प्रत्येकाची लगबग असते. अशा वेळी हे कर्दळीचे पान महिलांना पर्वणी वाटते. त्यामुळे सध्या कर्दळीच्या पानांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे.