रायगडमध्ये चोर्‍या करणार्‍या सराईताच्या मुसक्या आवळल्या

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

मागील कित्येक दिवस कोकणासह रायगडमध्य चोर्‍या करणार्‍या सराईत ज्वेलरी चोर गुन्हेगार हसणी नासिर हुसेन उर्फ इराणी याचाअखेर छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून 62 ग्रॅम 670 मिलीग्रॅम वजनाचे एकूण 1,69,487/- रुपयाचे सोन्याचे दागिने 100% मालमत्ता हस्तगत केली.

तपास पथकातील अमोल हंबीर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन संशयित आरोपीस घाटकोपर (मुंबई) येथून ताब्यात घेण्यात आले. तो मुळचा कर्नाटकातील बिदरचा रहिवाशी आहे. त्याच्याकडे गुन्ह्यांचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याने केलेल्या गुन्ह्याची प्रामुख्याने रायगड मधील तालुक्यातील रोहा, महाड, पोलिस ठाण्यात नोंद आहे. आता पर्यंत कोकणातील कुडाळ, कणकवली, खेड, येथे केलेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आले.

सदर आरोपीकडून एक सोन्याचे मंगळसूत्र, गंठण, अंगठी असे एकूण सोने 62 ग्रॅम 670 मिलीग्रॅम वजनाचे त्याची अंदाजे 1,69,487 रुपये किंमती माल जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलिस उपनिरीक्षक महेश कदम पोलिस हवालदार अमोल हंबीर, झेमसे, जितेंद्र चव्हाण,प्रतिक सावंत, राकेश म्हात्रे, मोकल, जाधव,खराटे, मोरे, यांच्या पथकाने पार पाडली.

Exit mobile version