स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गुगल पे आणि पेटीएमने पैस दिल्याचा बनावट मेसेज करुन व्यावसायीकांची फसवणूक करणार्या टोळील रायगड स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेन बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 13 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. गुन्हा अन्वेशन शाखेचे पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अलिबाग येथील ज्वेलर्स मालकांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली होती. अलिबागसह जिल्ह्यातील कोलाड आणि माणगावसह अन्य ठिकांणी पेटीएम आणि जीपेचा बनावट मेसेज करुन व्यावसायीकांची फसवणूक होत असल्याच्या तक्र्रारी होत्या. त्यानुसार दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाला गुन्हे अन्वेेशण शाखेचा एक पथक तयार करण्यात आला होता. तपास करताना पोलीस हवालदार अमोल हंबीर यांनी सीसीटिव्ही फुटेजमधील संशयीत हे मुंबई मलाड येथील असल्याचे निर्दशनास आले.
त्यानुसार स.पोलीस निरिक्षक नागेश कदम, विकास चव्हाण यांच्या पथकाने 3 जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली आहे. भाविक धर्मेश पडीयार, अपुर्व गोहील आणि मोहीत हरकिसन सिंग राजपूत अशी या तिघांची नावे असून बँडेड कपडे, शुज, घडाळ, मोबाईल तसेच वाहने वापरुन असल्याने समोरच्यावर इंप्रेशन पडात असत. दुकानांमध्ये जावून ज्वेलरी, व अन्य महागड्या वस्तु खरेदी केल्यानंतर ते पेमेंट जीपे किंवा पेटीएमने करतो असे सांगून दुकानदारांचा फोन नंबर मागून घेत. व त्यानंतरवर बल्कएसएमएस या वेबसाईटच्या सहा्याने स्वःता टाईप केलेला पैसे जमा झाल्याचा मेसेज पाठवून फसवणून करत.कधी कधी इंडीकॉल या अॅपच्या सह्याने ते फसवणू करत असत.
अशा प्रकारची फसवणूक केल्याप्रकरणी या सर्वांवर अलिबाग, कोलाड, माणगाव, अहमदनगर, भांडूप, ओशिवरा, आणि गुजरातमधील गोरवा येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. रायगड गुन्हे अन्वेशन शाखेन एक मोठी कारवाई करत व्यापार्यांची फसवणूक करणार्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून 13 लाख 19 हजार 340 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये स्कोडा कार, सोन्याचे दागिणे, महागडे मोबाईल आणि दारु जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, एखादी वस्तु खरेदी केल्यानंतर ग्राहकांने पैसे जमा केल्याचा मेसेज दाखवल्यानंतर ते आपल्या खात्यात जमा झालेत का याची खात्री करुन माला द्यावा असे आवाहन रायगड पोलीसांनी केले आहे.”
please send mail on bharatranjankar@gmail.com