| नेरळ | प्रतिनिधी ।
चिकनपाडा येथे संशयास्पद गोवंशीयने भरलेला टेम्पो नेरळ पोलिसांकडून पकडण्यात आला. या टेम्पोत एकूण चार गोवंशीय आढळून आले असून त्यांना नेरळ येथील गोशाळा येथे सोडण्यात आले. तसेच, दोन फरार आरोपींपैकी एका आरोपीला पकडयात पोलिसांना यश आले आहे.
चिकनपाडा-साळोख रस्त्याने जाणारा मिनी टेम्पो (एमएच-05-इएल-8619) संशयास्पद जाताना दिसला. यावेळी सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे यांनी गाडीचा पाठला करून गाडी अडवली. टेम्पो चालक आणि क्लीनर यांना गाडीची पाहणी करायची आहे असे सांगताच दोघांनी चकवा देत पळ काढला. किसवे यांनी टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये तांबडया रंगाची गाय, काळया रंगाचा बैल, काळ्या व काळ्या तांबूस रंगाची गायव असे चार गोवंशीय जनावरे असल्याचे आढळून आले.
यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी चिकनपाडा येथे पाहणी केली असता आरोपींनी गोवंशीय जनावरे चोरून आणून त्यांना दाटीवाटीने कोंबून ती कत्तल करण्याच्या उदेशाने नेत असल्याचे समोर आले. फरार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एका आरोपीला पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. या चारही गोवंशीय जनावरांना नेरळ येथील गोशाळा येथे रात्री सोडण्यात आले असून मिनी टेम्पो ताब्यात घेतला आहे. अधिक तपास शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक लोढे करीत आहेत.