नागाला जेरबंद करण्यात यश

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

खालापूर तालुक्यातील कुंभीवली गावामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणार्‍या नागाला गणेश पाटील यांनी सर्पमित्र अमोल ठकेकर यांना बोलवून जेरबंद केले.

निसर्गाचा र्‍हास होत असताना जंगलातील सरपटणार्‍या मुक्या प्राण्यांनी आपला मोर्चा गावाकडे वळविला असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत चालला आहे. सरपटणारे प्राणी हे रस्ता क्रॉस करीत असतांना अपघाती मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही प्राणी मनुष्य वस्तीत आल्यामुळे त्यांच्या जिवाला तसेच येथे राहणारे ग्रामस्थांच्या जिवाला देखील धोका निर्माण होत आहे. यातच कुंभीवली येथिल ग्रामस्थ अनेक दिवस नागाच्या भीतीमुळे भयभीत झाले होते. मात्र, सर्पमित्र ठकेकर यांनी एका घरामधून या नागाला जेरबंद केले असून त्याला जंगलात सोडून दिले आहे.

Exit mobile version