| रसायनी | प्रतिनिधी |
अल्काईल अमाईन्स आणि चावणे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने चावणे हायस्कूल येथे आयोजित अल्काईल अमाईन्स अंतर शालेय क्रिडा महोत्सव 2025 मध्ये महिला उद्योग मंडळाची प्राथमिक शाळा पराडे या शाळेने 11 सांघिक तर 8 वैयक्तिक क्रिडा प्रकारात बक्षिसे मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे शाळा आणि संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. 12 वर्षाखालील लंगडी, मुले प्रथम क्रमांक मुली द्वितीय क्रमांक, 14 वर्षाखालील लंगडी मुले द्वितीय क्रमांक मुली प्रथम क्रमांक, 14 वर्षाखालील व्हॉलीबॉल मुले प्रथम क्रमांक, 14 वर्षाखालील खो-खो मुले द्वितीय क्रमांक, मुली प्रथम क्रमांक, 14 वर्षाखालील रस्सीखेच, मुले प्रथम क्रमांक, मुली द्वितीय क्रमांक, 14 वर्षाखालील डॉजबॉल, मुले द्वितीय क्रमांक, 12 वर्षाखालील डॉजबॉल, मुले प्रथम क्रमांक, 12 वर्षाखालील 80 मी. धावणे मुली निधी म्हात्रे द्वितीय, 12 वर्षाखालील 150 मी. धावणे मुली श्रीशा दहिफळे तृतीय, 12 वर्षाखालील 80 मी. धावणे मुले मयांक वाघे द्वितीय, 12 वर्षाखालील 150 मी. धावणे मुले आरव गायकवाड प्रथम, 14 वर्षाखालील 200 मी. धावणे मुली सान्वी शिर्के प्रथम, 14 वर्षाखालील 100 मी. धावणे मुले श्रीयोग नांगडे द्वितीय, 14 वर्षाखालील 200 मी. धावणे मुले जय गायकवाड द्वितीय, 14 वर्षाखालील थाळी फेक मुले कुंदन दरडे द्वितीय यांनी सूयश संपादन करुन शाळेचे मोहोपाडा महिला उद्योग मंडळाच्या शाळेचे नावलौकीक केले.
महिला उद्योग मंडळाच्या शाळेस यश
