| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा येथील कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालयाने आंतर महाविद्यालयीन गजलगोई व बेतबाजी स्पर्धेत प्रथम व तृतीय क्रमांकाची बाजी मारली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्यामधील सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने जाणीव जागृती व्हावी, यासाठी विविध स्पर्धा राबवल्या जातात. आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत एकूण 27 विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतला होता. तसेच वसंतराव नाईक व बॅरिस्टर अंतुले महाविद्यालयातील एकूण 05 विद्यार्थीनी गजलगोई व बेतबाजी अश्या दोन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
बेतबाजी या स्पर्धेत नाईक अंतुले महाविद्यालयातील विद्यार्थिनी सारा काठेवाडी, इक्रा अकलेकर, सादिया करबेलकर या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आणि गजलगोई या स्पर्धेत फिझा पठाण या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, विश्वस्त सचिव प्रतिनिधी फझल हळदे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महादेव पाटील, श्रीमती निलम वेटकोळी, प्र. प्राचार्य प्रा. डी. ए. टेकळे, माजी प्राचार्य एम. एस. जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या कडून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव करण्यात आला व सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.एम.एच.सिद्धिकी व प्रा.सादिका अन्सारी तसेच या विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी सातत्याने स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले.