शिष्यवृत्ती परीक्षेत यश

| नेरळ । वार्ताहर ।
पूर्व प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नोव्हेंबर महिन्यात जाहीर झाला होता. या परीक्षेत कर्जत तालुक्यात पाचवीमध्ये 68 विद्यार्थी पास झाले असून त्यातील 12 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. तर आठवी मध्ये केवळ 18 विद्यार्थी पास झाले असून त्यापैकी 12 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.पाचवी मध्ये 13.39टक्के विद्यार्थी पास झाले असून आठवीमध्ये केवळ 6.21 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.तालुक्यात एलएईएसची संस्कृती नवाळे ही पाचवीमध्ये पहिली आली असून ती रायगड जिल्ह्यात तिसरी आली आहे.

तर आठवीमध्ये नेरळच्या विद्या विकास मंदिर शाळेचा प्रज्वल पवार तालुक्यात पहिला आणि जिल्ह्यात सहावा आला आहे. पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 558 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते,त्यातील 508विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.त्यातील 68 विद्यार्थी हे पास झाले. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कर्जत तालुक्यातील 308 विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी अर्ज दाखल केले होते.त्यापैकी 290 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 18 विद्यार्थी पास झाले.

Exit mobile version