सकाळ सत्रातील शाळा 15 मार्च ऐवजी 1 मार्चपासून सुरू होणार
। खांब । वार्ताहर ।
जिल्ह्यातील वाढत जाणारे तापमान, खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये निर्माण होणारा अडथळा अशा बिकट परिस्थितीत मार्च महिन्यात सकाळ सत्रात भरवणार्या शाळा या (दि.15) मार्च ऐवजी (दि.1) मार्च पासून सुरू व्हाव्यात व त्यानिमित्ताने अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक सुसह्य व्हावी या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या कार्यकारीणीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड व शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून समितीच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.
गेली अनेक वर्षे मार्च महिन्यातील (दि.15) तारखेपासून सुरू होणारी शाळा ही शैक्षणिक वर्षामध्ये (दि.15) तारखेऐवजी 15 दिवस अगोदर म्हणजेच (दि.1) मार्चपासून सुरू करण्यात यावी याबाबत प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. तसेच संघटनेच्या माध्यमातून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला गेला. त्यानुसार मागणी मान्य करीत शिक्षणाधिकारी यांनी मार्च महिन्यातील सकाळ -सत्रातील शाळा (दि.1) मार्चपासून भरण्याबाबत निर्णय घेतला आहे.