आष्टे लॉजिस्टिकमधील कामगारांच्या लढ्याला यश

साखळी उपोषण मागे

| रसायनी | वार्ताहर |

कसलखंड आष्टे लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीत गेल्या चार दिवसांपासून कामगारांच्या न्याय हक्कासाठी कोकण श्रमिक संघ, संलग्न हिंदू मजूर सभा महाराष्ट्र कौन्सिलच्या कामगार नेत्या व जनरल सेक्रेटरी श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. अखेर या लढ्याला माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे कामगारांचा प्रश्‍न निकाली निघाला असून त्यांना आज मंगळवार दि.20 रोजी न्याय मिळाला आहे.

कामगारांच्या न्यायहक्कासाठी व कामगारांच्या हाकेला धावून जाणारी ही जिल्यातील संघटना असून या संघटनेचे कामगारांनी सभासत्व घेऊन याचे नेतृत्व करण्याचे अधिकार कामगार नेत्या जनरल सेक्रेटरी श्रुती म्हात्रे यांना देण्यात आले होते. यावेळी संघटनेच्या कामगाराला कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून तडकाफडकी कमी करण्यात आले होते. कामगारांच्या प्रमुख मागण्यांवर चर्चा करून करार करण्यात यावा, तसेच कंपनीतील नवीन भरती सुरू केलेली आहे ती तात्काळ थांबवावी या मागण्या घेऊन साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. सलग चार दिवस हे साखळी उपोषण सुरू असताना अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या उपोषणास पाठिंबा देत भेटीही दिल्या. जर माझ्या प्रकल्पग्रस्त कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मंगळवारपासून गेट बंद आंदोलन करू असा इशारा श्रुती मात्रे यांनी दिला होता. या इशार्‍याला माजी आमदार आमदार मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, प्रितम म्हात्रे, माजी उपसभापती वसंत काठावले, रघुनाथ पाटील पुढे सरसावत भक्कम पाठिंबा दिला. या आंदोलनाचा धसका कंपनी प्रशासनाला बसला असता तात्काळ शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर कंपनी प्रशासनाने बैठकीसाठी बोलाविले. यावर सकारात्मक चर्चा होऊन, कामावरून कमी केलेल्या कामगाराला पुन्हा कामावर रुजू करण्यात आले. 21 फेब्रुवारी रोजी कंपनी प्रशासन बैठक घेऊन दिलेल्या निवेदनावर सविस्तर चर्चा करून दोन महिन्यात कामगारांनी मागणी केलेल्या निवेदनावर करार करून सह्या होतील, असे आश्‍वासन कंपनीचे एम.डी. महादेव पवार, चंद्रकांत ठक्कर, राजकुमार रलवणी यांनी आश्‍वासन दिले असता कामगारांचा प्रश्‍न मार्गी निघाला. यावेळी जनरल सेक्रेटरी कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, सेक्रेटरी एकनाथ ठोंबरे, माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी पंचायत समिती उपसभापती वसंत काठावले, तालुका अध्यक्ष शिवसेना रघुनाथ पाटील, शेकाप युवा नेते देवा पाटील, कामगार नेते उत्तम भोईर, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व कामगारवर्ग तसेच, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version