आदर्श केंद्रशाळेच्या विध्यार्थीनींचे यश

। खांब । वार्ताहर ।

कोलाड येथील आदर्श केंद्रशाळेतील गार्गी बाबासाहेब ढाकणे व आकृती एकनाथ तेलंगे या विद्यार्थिनींनी विविध स्पर्धा परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवून आपल्या शाळेचा गौरव वाढविला आहे.

गार्गी ढाकणे ही जवाहर नवोदय विद्यालय स्पर्धा परीक्षेत उत्तम गुणांनी गुणवत्ता यादीत येऊन नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरली आहे. तेसच, पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात पहिली तर जिल्ह्यात गुणवत्ता यादीत तृतीय आली असून रायगड गणित, विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित गणित संबोध परीक्षा सन 2024 रोहा तालुक्यात प्रथम आली आहे. या शाळेची दुसरी गुणवंत विद्यार्थिनी आकृती एकनाथ तेलंगे ही पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम गुणांनी पास होऊन शिष्यवृत्ती धारक झाली आहे. तसेच, रायगड जिल्हा गणित विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित गणित संबोध परीक्षा 2024 या परीक्षेत तालुक्यात दुसरी आली आहे.
या दोन्ही विद्यार्थिनींना सपना थळे, मुख्याध्यापिका श्‍वेता रिसबुड, संगिता म्हात्रे, सीमा कळमकर, पप्रवीण घाग, शुभांगी येरुणकर, रुची सामंत, मानसी जोशी, नंदकुमार तेलंगे आदी शिक्षकांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

Exit mobile version