| पेझारी | वार्ताहर |
स्पर्धा परीक्षांचा पाया प्राथमिक स्तरावरच भक्कम व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पोयनाड येथील को.ए.सो.ना.ना.पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी आराध्य समीर पाटील हा रायगड जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये अकरावा तर अलिबाग तालुका गुणवत्ता यादीमध्ये चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे.
आराध्य हा शालेय अभ्यासाबरोबरच इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा खूपच हुशार आहे. विशेषतः बासरी वादन आणि अभिनय क्षेत्रामध्ये आराध्यने जिल्हा व राज्यस्तरावर अनेक पारितोषिके मिळविलेली आहेत. अशा या तल्लख बुध्दीच्या, गुणी विद्यार्थ्यांने मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेचे सभापती माजी आ. सुभाष पाटील तथा पंडित शेठ, माजी राजिप सदस्या भावना पाटील, को.ए.सो. समन्वय समिती सचिव अशोक गावडे, पेझारी केंद्रप्रमुख वि.का. पाटील, मुख्याध्यापक शशिकांत पाटील, शिक्षक प्रतिनिधी देवेंद्र पाटील, सत्र प्रमुख समीर भोईर, उदय पाटील, तृप्ती पिळवणकर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
तसेच, आराध्यचे पालक रंजना पाटील, समीर पाटील मार्गदर्शन करणारे शिक्षक सुनिता पाटील, सुवर्णा पाटील, जयश्री आंधळे, सुप्रिया म्हात्रे, निनाद पाटील यांचेही शाळा समितीतर्फे अभिनंदन करण्यात आले.