विज्ञान प्रदर्शनामध्ये भडवळ शाळेचे यश

| नेरळ | वार्ताहर |

शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षातील 51 वे विज्ञान प्रदर्शन नेरळ येथील हाजी लियाकत इंग्लिश मीडियम स्कूल नेरळ येथे भरवण्यात आले होते. त्यामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा भडवळ या शाळेतील शिक्षक व विद्यार्थींन अनेक उपक्रमांमध्ये यश संपादन केले. यामध्ये शिक्षक प्रतिकृती शैक्षणिक साहित्य प्राथमिक विभाग प्रथम क्रमांक देविदास वसावे, शिक्षक प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रथम क्रमांक महेश खाड, 3 री ते 5 वी चित्रकला/रंगभरण स्पर्धा प्रथम क्रमांक जिविका अशोक माळी भडवळ शाळा, विद्यार्थी प्रतिकृती आधुनिक शेती सहभाग प्रशस्तीपत्र कल्याणी रविंद्र शेळके आणि तन्वी काशिनाथ भुंडेरे या विद्यार्थी व शिक्षकांन सहभाग घेतला होता.

या यशाचे कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड, हाजी लियाकत इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक अब्दुल सय्यद व सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी यांनी रा.जि.प. शाळा भडवळ शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version