जानकीबाई जनार्दन ठाकूर शाळेचे यश

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कुल येथे पावसाळी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आवरे येथील आत्माराम ठाकूर मिशन व जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्रजी माध्यमने प्रथम क्रमांक मिळवून यश प्राप्त केले आहे. त्यामुळे विजेत्या स्पर्धकांचे व क्रिडा शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. हा विजय शाळेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर यांना अर्पण करण्यात आला आहे. संस्थेचे विश्वस्त वामन ठाकूर, अलका ठाकूर, सिंधु ठाकूर, मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी विजेत्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Exit mobile version