। उरण । वार्ताहर ।
जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल, आवरे, ता. उरण या शाळेचा विद्यार्थी तर देवांग क्लासेस-गोवठणेचे संचालक नरेंद्र वर्तक यांचा सुपुत्र देवांग नरेंद्र वर्तक हा महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे इ.आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2020-21 या परीक्षेत ग्रामीण विभागात उरण तालुक्यात पहिला तर रायगड जिल्ह्यात 14 व्या क्रमांकाने शिष्यवृत्ती मिळवून उत्तीर्ण झाला आहे. तर याच वर्षी झालेल्या नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप परिक्षेत चार वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे. या दुहेरी यशाबद्दल देवांग वर्तक व त्याला मार्गदर्शन करणार्या शाळेचे, सर्व शिक्षक, कर्मचारी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवांग वर्तकचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.