उडान महोत्सवात लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे यश

| पेण | वार्ताहर |

मुंबई विद्यापीठाअंतर्गत आजिवन अध्ययन व विस्तार विभाग युनिटतर्फे शुक्रवार (दि. 18) फेस्टीवलचे आयोजन ‘भाऊसाहेब नेने कॉलेज’ पेण येथे करण्यात आले होते. यामध्ये विविध स्पर्धां घेण्यात आल्या. यापैकी पथनाट्य या स्पर्धेमध्ये लोकमान्य शिक्षण प्रसारक चोंढी-किहिम मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. या स्पर्धेमध्ये राहुल कोकरे, शितल भगत, दिव्या पाटील, ऋजुता पाटील, सई शिंदे ,सायली गोठणकर, जान्हवी कडवे, अक्षय भोईर, ओम घरत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पथनाट्यासाठी विद्या घरत, तृप्ती खोत या प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. विजयी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी रवींद्र ठाकूर, प्रमोद पाटील, राजाभाऊ ठाकूर, प्रवीण ठाकूर, सुनील थळे, जगन्नाथ पेढवी महाविद्यालयाच्या प्राचार्या लीना पाटील तसेच सर्व प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version