कराटे स्पर्धेत मुरूडच्या विद्यार्थ्यांचे यश

दोन सुवर्णपदकांसह 16 पदकांची कमाई
| मुरुड | प्रतिनिधी |
जिल्हास्तरीय तिसरी सोके क्लेमेंट सू कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा 26 फेब्रुवारी रोजी पनवेल येथे पार पडली आहे. या स्पर्धेत मुरूड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून दोन सुवर्णपदकासह पदकांची कमाई केली आहे. इंडिया गोशिन रियू कराटे असोसिएशन व शिहान-राजू कोहली यांनी ही कराटेची स्पर्धा आयोजित केली होती. या कराटे स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातून मुरुड, रोहा, अलिबाग, नागोठणे, कर्जत, पेण, पनवेल, खोपोली, श्रीवर्धन इत्यादी जिल्ह्यातून या कराटेच्या स्पर्धेकरिता खेळाडूं आले होता. तसेच या स्पर्धेमध्ये 130 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग होता. पुन्हा एकदा मुरुड तालुक्यातील कराटेपटूंनी तालुक्याचे नाव उज्वल केले. दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि नऊ कांस्यपदके अशी एकूण 16 पदकांची कमाई करीत मुरुड तालुक्याच्या विद्यार्थ्यांनी मुरूडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

या स्पर्धेमध्ये मुरुडच्या कराटेपटूंनी नेत्रदीप कामगिरी केली. तसेच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट विद्यार्थी हे बक्षीससुद्धा मिळविले आहे. सर्व विद्यार्थ्यांची पुढील प्रमाणे आहेत. नचिकताज हायस्कूल/वंडर किड्स आस्था अपराध- काता प्रथम क्रमांक ट्रॉफी व कांस्य पदक, स्नेहला पाटील- रौप्य व कांस्यपदक, स्वयं अपराध- काता तृतीय क्रमांक ट्रॉफी व कांस्यपदक, मेहबूब हायस्कूल- विहूर पूर्वा घाग- रौप्य व कांस्यपदक, मॉर्निंग स्टार स्कूल – मुरुड परणद जितेंद्र कांबळे- काता तृतीय क्रमांक ट्रॉफी व नज हायस्कूल नवीन मजगाव स्वरा विरकोट- काता प्रथम क्रमांक ट्रॉफी व रौप्यपदक, मिंधळे हायस्कूल रोहा अवधूत भोसले- काता तृतीय क्रमांक ट्रॉफी व रौप्यपदक, वसंतराव नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज. प्रवेश पुलेकर-काता तृतीय क्रमांक ट्रॉफी व रौप्यपदक हे सर्व विद्यार्थी ओकिनावा रियू कियू शितो-रियू कराटे डो क्योकाई इंडिया या संस्थेच्या शिकत आहेत. तसेच यांना शिहान डॉ. आदित्य अनिल (एशिया चीफ), सेंसाय- सनी खेडेकर (महाराष्ट्र मुख्य प्रशिक्षक व पश्‍चिम भारत संचालक ), सेंसाय शिवम सिंग, सेंपाय- पर्वणी चोरघे, सेंपाय- तन्वी म्हात्रे, सेंसाय- अनुज भोईर, सेंसाय- नेहाल घोले इत्यादींचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version