उड्डाण महोत्सवात पालीवाला महाविद्यालयाचे यश

विद्यार्थ्यांनी केली बक्षिसांची लयलूट

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन आणि विस्तार कार्य विभागांतर्गत उड्डाण महोत्सव शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालय, पाली सुधागड येथे मुंबई विद्यापीठाचे डॉ. कुणाल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रा. डॉ. सुधाकर लहूपचांग यांच्या पार पडला. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी बक्षिसांची लयलूट केली.


या महोत्सवात एकूण रायगड जिल्ह्यातील 17 महाविद्यालय व 247 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या महोत्सवामध्ये विविध स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी रायगड जिल्हा क्षेत्रीय समन्वयक देविदास शिवपुजे, देविदास बामणे, पालीवाला महाविद्यालयाचे आजीवन विस्तार कार्यशिक्षक यशवंत भांडकोळी, दिलीप निकम यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. महोत्सवात पार पडलेल्या स्पर्धेत ज.नौ. पालीवाला महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.

निकाल पुढीलप्रमाणे :
भित्तीपत्रक स्पर्धा : प्रथम क्रमांक- मोहन परधी, पथनाट्य स्पर्धा : द्वितीय क्रमांक : हर्षद पाटील (लेखक डायरेक्ट), सहभागी विद्यार्थी प्रणाली गायकवाड, सानिका देवरूखकर, रोशनी सागले, भाविका काटकर, इशानी मांडूसकर, तनुजा मंगल, अक्षता लहर्रींरप, साक्षी किरण जैसवार. वक्तृत्व आणि सर्जनशील लेखन स्पर्धेत महाविद्यालयाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले आहे. या स्पर्धेचे परीक्षण मुंबई विद्यापिठातील तज्ज्ञ परीक्षकांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहल बेलवकर, तर आभार यशवंत भांडकोळी यानी केले.

Exit mobile version