| पाली | वार्ताहर |
शेठ जे.नौ. पालीवाला महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि पाली गावचा आर्यन शिरीष सकपाल यांची मुंबई विद्यापीठ कोकणझोन क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. आर्यन पाली येथील दत्ता चव्हाण क्रिकेट अकॅडमीमध्ये सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. डी.जी रूपारेल कॉलेज मुंबईतर्फे 5 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत मुंबई विद्यापीठ विद्यानगरी क्रीडा संकुल सांताक्रुज येथे क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. आर्यनची या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड जाहीर झाल्यानंतर त्यांचे सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा गीता पालरेचा उपाध्यक्ष रवींद्र लिमये प्राचार्य लहू पांचाग तसेच, पालीवाला महाविद्यायाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांच्याकडून सन्मान करून वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.