रत्नागिरी जल्लोष-ओपन मॅरेथॉन स्पर्धेत सावर्डे विद्यालय खेळाडूंचे यश

स्वराज जोशी व श्रेयश ओकटे जिल्ह्यात पहिले
। चिपळूण । प्रतिनिधी ।
रत्नागिरी थलेटिक्स असोसिएशनच्यावतीने रत्नागिरी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा स्तरीय जल्लोष – ओपन मॅरेथॉन स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्वराज जोशीने 17 वर्षाखालील मुलांच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करीत तीन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धत प्रथम क्रमांक प्राप्त केला तर रिया गुजर हिने 17 वर्षाखालील मुलींच्या दोन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धत तृतीय क्रमांक प्राप्त केला आणि 16 वर्षाखालील मुलांच्या गटात श्रेयश ओकटे याने दोन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धत प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धेत सावर्डेचे प्रतिनिधीत्व स्वराज जोशी , रिया गुजर आणि श्रेयश ओकटे यांनी केले. क्रीडा शिक्षक उदयराज कळंबे, अमृत कडगावे व रोहित गमरे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व कार्यतत्पर आ. शेखर निकम, संस्थेचे सचिव महेश महाडिक,संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड,ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर,संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी,शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक अन्वर मोडक, उपमुख्याध्यापक विजय काटे,पर्यवेक्षक उद्धव तोडकर, ज्युनिअर विभागाचे प्रमुख विजय चव्हाण, एम.सी.व्ही.सी विभाग प्रमुख सलीम मोडक, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version