अबॅकस स्पर्धेत एस.जी.कुडेकर स्कूलचे यश

| म्हसळा । वार्ताहर ।
विद्यार्थ्यांची गणितीय आकडेमोड जलद गतीने करता यावी तसेच मेंदूच्या विचारशक्तीला योग्य दिशा मिळण्यासाठी अबॅकस स्पर्धेचे नियोजन केले होते. माणगाव येथील सुधाकर नारायण शिपूरकर स्कूल मध्ये झालेल्या अबॅकस स्पर्धेत म्हसळा येथील एस. जी. कुडेकर इंटरनॅशनल स्कूल च्या 4 थी च्या 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी 10 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून आपल्या शाळेसह तालुक्याचे नाव उज्वल केले.

सम्स-ऍडिशन आणि सब्स्ट्रॅकशन विदाउट फॉर्मुला स्पर्धेत रुही दळवी, रिचा जैन, आर्या जंगम आणि प्रदर्श वाख तसेच स्पीड रायटिंग स्पर्धेत कृपा करंबे, विहान लटके, धून जैन, जीत बोर्ले आणि मेहुल मोरे आणि नंबर्स टू बिड्स अँड बिड्स स्पर्धेत हर्षिता पयेर आणि प्रदर्श वाख या विद्यार्थ्यांनी विशेष यश प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सुरेश कुडेकर, श्रीमती. गजगे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version