वाणदे हायस्कूलच्या नियतीचे यश

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

मुरूड तालुक्यातील वाणदे येथील कोएसो संचलित म.ह.दिवेकर हायस्कूलचा शालान्त परीक्षा निकाल 94.44 इतका लागला असून नियती नितीन नाक्ती ही विद्यार्थीनी 413 (82.60टक्के) गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. द्वितीय क्रमांक शालिनी रमेश गायकर 393 (78.60 टक्के), तृतीय क्रमांक नियती अरुण कांबळे 370 (74 टक्के), चतुर्थ क्रमांक अथर्व राजू नाक्ती 363 (72.60 टक्के), पंचम क्रमांक वेदांती सुरेश माळी 353 (70.60 टक्के) असे गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. म.ह. दिवेकर वाणदे हायस्कूल हे ग्रामिण भागातील दर्जेदार शिक्षण देणारे हायस्कूल असून येथे परिसरातील सुमारे 15 गावांतील विध्यार्थी माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेतात. 1986 मध्ये या हायस्कूलची स्थापना वाणदे गावी झाली आहे. शाळा समिती अध्यक्ष तुकाराम दामोदर पाटील, मुख्याध्यापक समीर जेठारी आणि सर्व स्टाफ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.36 पैकी 34 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची माहिती तुकाराम पाटील यांनी दिली.

Exit mobile version