। रेवदंडा । वार्ताहर ।
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या वि.म. पिळणकर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवीत बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. कलाशाखेतील वैदांती दीपक पाबरेकर या विद्यार्थिनीने 91 टक्के गुण मिळवून सर्व शाखांत प्रथम क्रमांक पटकाविला.
विज्ञान शाखेचा निकला शंभर टक्के लागला असून, वैष्णवी विनायक भोनकर या विद्यार्थिनीने 73.33 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. त्याप्रमाणे वाणिज्य शाखेचा निकालही शंभर टक्के लागला असून, ॠतिक राजेश झावरे 79.18 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तसेच कला शाखेचा निकाला 98.33 टक्के लागला असून, वैदांती दिपक पाबरेकर 91 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. त्याप्रमाणे व्होकेशनल कोर्सचा निकाला 90 टक्के लागला असून, प्रतीक्षा दत्ताराम रामाणे या विद्यार्थिनीने 75.17 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा समितीच्या चेअरमन सरोज वरसोलकर व महाविद्यालयाच्या प्राचार्य स्नेहल म्हात्रे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.