विजय विकास सामाजिक संस्थेचे यश

। उरण । प्रतिनिधी ।

पनवेल तालुक्यातील भानुबैन प्रवीण शहा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात ‘शोके कप कराटे चॅम्पियनशिप 2025’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वात जास्त पदकं मिळविण्याचा मान विजय विकास सामाजिक संस्था सेल्फ डिफेन्स कराटे ऑल स्टाईल कराटे इन्स्ट्रक्टर असोशियन या अकॅडमीला मिळाला आहे. या अकॅडमीतील एकूण 25 मुलांनी सहभाग घेतला होता. त्यातील 20 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, 9 विद्यार्थ्यांनी रौप्यपदक व 10 विद्यार्थ्यांनी कांस्यपदक मिळवून यश प्राप्त केले आहे. या सर्व विजयी विद्यार्थ्यांचे मास्टर दीपक घरत, विकास भोईर, प्रगती भोईर, अथर्व घरत तसेच विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषद विद्यमान सदस्य विजय भोईर यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version