। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील प्रयत्नाने बुधवारी (दि.22) ढवर व झालखंड, जांभूळपाडा, घोटवडे, वळवली, लोणारे येथील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तीन टप्प्यात सुमारे पाच हजारांहून अधिकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी चित्रलेखा पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. शेकापच्या माध्यमातून दि. 1 ते 8 सप्टेंबर लसीकरणाचा पहिला व दि. 15 ते 18 सप्टेंबर रोजी दुसर्या टप्पा यशस्वीरित्या पार पडला. यावेळी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी अत्यंत चोख नियोजन केले होते. मंगळवारी या मोहिमेचा तिसरा टप्पा सुरु झाला. शेकापतर्फे तोडकरी रुग्णालयात नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात आले. ऑफलाईन पद्धतीची असणारी ही लसीकरण मोहिम गावपातळीनुसार सुरु करण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करुन नागरिकांनी लस घेतली. या मोहिमे अंतर्गत रोज एक किंवा दोन गाव असे लोकांना लस देण्यात येत आहे. चौथा टप्पा लवकरचं सुरू होईल असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले. चौथ्या टप्यात आमचा विभागवार लसीकरण कॅम्प घेण्याचा मानस आहे. जे लसीकरणा पासून वंचित राहिले आहेत त्यांचे सुद्धा लवकरच लसीकरण करण्यात येईल,असेही त्या म्हणाल्या.