| रसायनी | प्रतिनिधी |
खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत चौक पोलीस दूरक्षेत्र हद्दीत येत असणाऱ्या विणेगाव येथील सुदाम लक्ष्मण धारपवार ही व्यक्ती घराचे जवळ असलेल्या आंब्याच्या झाडाजवळून कोणालाही काही एक न सांगता कोठेतरी निघून गेलेला आहे. याबाबत खालपूर पोलीस ठाण्यात सीमा सुदाम धारपवार यांनी त्यांचे पती सुदाम लक्ष्मण धारपवार हे मनोरुग्ण असून, घराचे जवळ असलेल्या आंब्याचे झाडाजवळून कोणालाही काहीए क न सांगता कोठेतरी निघून गेले आहेत, अशी माहिती दिली आहे. याबाबत पोलीस ठाणे येथे मनुष्य मिसींग दाखल आहे.
बेपत्ता असलेले सुदाम लक्ष्मण धारपवार यांचे वय 48 वर्षे, रंग निमगोरा, उंची 172 सेमी, अंगाने सडपातळ, चेहरा गोल, डोळे काळे, केस काळे साधारण पांढरे, कपाळावर गंध लावलेले, ओळख खूण कपाळावर चामखिळ निमगोरा रंगाचा, नेसून अंगात लाल रंगाचा टीशर्ट, काळे रंगाची फुल पॅन्ट आहे. या वर्णनाचा व्यक्ती कोणास अढळल्यास यांनी खालापूर पोलीस ठाण्याशी 02192-275033 अथवा तपासिक अंमलदार :- आर.एन. बागुल 8983241114 यांना संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सुदाम धारपवार बेपत्ता
