| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल वसाहतीमधून एक महिला आपल्या एक वर्षाच्या मुलाला घेऊन कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेली आहे. याबाबत खंडेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिरोजा बेगम राजु दास (वय 25) ही मोंटु (वय 1) याला घेऊन नवीन पनवेल सेक्टर सहा येथील राहत्या घरातून पतीने मारल्याचा राग मनात धरून काही एक न सांगता कोठेतरी गेली आहे. याबाबत सदर महिलेचा पती राजु बाबु दास (वय -42) याने खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर महिलेचा रंग – सावळा, उंची 5 फुट, बांधा-सडपातळ, नाक-सरळ फुगीर, केस-काळे व लांब, अंगात आकाशी रंगाचा कुर्ता व काळया रंगाची लेगीज, पायात लाल रंगाची लेडीज चप्पल, तसेच तिच्या सोबत असलेला लहान मुलगा मोंटुचा रंग सावळा, अंगाने सडपातळ, अंगात आकाशी रंगाचा टी शर्ट व हाफ पॅन्ट घातला आहे या दोघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाणे किंवा पोलीस हवालदार नवनाथ नरळे यांच्याशी संपर्क साधावा.