महाड शहरातील विद्युत रोहित्राला अचानक आग

| महाड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील प्रांत कार्यालयांच्या शेजारी असणाऱ्या विद्युत रोहित्राने सायंकाळच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने आजूबाजूच्या परिसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले. प्रांत कार्यालयाच्या शेजारी असलेल्या हाराच्या दुकान गाळा मालकाने आपल्या दुकानाच्या समोर असलेला कचरा जाळल्याने ही आग लागली असे सहाय्याक अभियंता ए.एल.भोयंलकर यांनी सांगितले. परंतु, आगीची ठिणगी लगतच्या विद्युत रोहित्रावर पडल्याने ऑइलने अचानक पेट घेतल्याने आगीने रुद्र रूपं धारण केल्याने बाजूला असलेल्या दुकानदारांच्या गाळ्यामुळे ही आग विझवण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. घटनास्थळी विद्युत रोहित्रामध्ये ऑइल असल्यामुळे आगीवर फोमचा मारा करून आग विझवण्यासाठी महाड अग्निशामक दलांच्या जवानांना काही वेळातच ही आग विझवण्यास यश आले. परंतु, घटनास्थळी असलेल्या दुकानदारांच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागली असे ही घटनास्थळी असलेल्या नागरिकांमध्ये बोलले जात होते. या आगीमुळे आजूबाजूला असलेल्या दुकानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, विद्युत रोहित्र जळून राख झाले असे एमएसईबीचे अधिकारी यांनी सांगितले. परंतु, काही काळासाठी महाड शहरातील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता. घटनास्थळी महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हजर झाल्याने पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version