अवकाळी पावसाने सुधागडला झोडपले

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

वादळी वार्‍यासह तुफान पाऊस

| पाली | प्रतिनिधी |

गेली अनेक दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी (दि.13) दुपारी सुधागडात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने पाली, परळी, पेडली, महागाव, नांदगावसह सुधागड तालुक्याला झोडपून काढले. यामुळे तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. पाली खोपोली राज्य मार्गावर परळीसह अनेक ठिकाणी झाले कोलमडून पडली तर झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. त्यामुळे परळी बाजारपेठेत काहीवेळ वाहतूक कोंडी झाली असून वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र मोहिते कंस्ट्रक्शन चे मालक पी.डी मोहिते यांनी आपले स्वतःचे जेसीबी मशीन पाठवून महामार्गावर पडलेली झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली.

सततच्या पडणार्‍या अवकाळी पावसामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचा दिसून येते. अवकाळीमुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान होऊन त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. तर लग्न सराईचा शेवटचा टप्पा बाकी असताना अवकाळी पावसाने धुडगूस घातला आहे. गावोगावी उभे असलेल्या लग्न मंडपांचा भिजवून चिखल होऊन वराडांची पळापळ झाली. रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून गटारे, नाले तुडुंब भरली आहेत.

Exit mobile version