| अलिबाग | प्रतिनिधी |
धेरंड-शहापूर येथील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य सुधीर थळे यांची विभागीय चिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. विभागीय चिटणीसपदाचे नियुक्तीपत्र तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, जिल्हाचिटणीस मंडळ सदस्य अनिल पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते अमरनाथ पाटील, विलास म्हात्रे, दिगंबर म्हात्रे, अजित भगत, अलिबाग तालुका युवक संघटना अध्यक्ष विक्रांत वार्डे, तालुका उपाध्यक्ष सुरज म्हात्रे, ॲड. शोधन ठाकरे, प्रमोद घासे, विजय पाटील आदींसह शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षामध्ये निष्ठेला फार मोठे महत्त्व आहे. अनेक वर्षे पक्षाची निष्ठेने सेवा करणारे, संघटन वाढविणारे आणि पक्षहित जपणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान राखणे हीच शेकापची परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते सुधीर थळे यांची शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी शहापूर विभागाचे विभागीय चिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे विभागातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुधीर थळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना विभागीय चिटणीस पदाचे पत्र देण्यात आले.







