| खोपोली | प्रतिनिधी |
मुबंई पुणे जुन्या महामार्गावर आज सकाळी साखरेच्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक समोरील धकाडावर जाऊन आदळून पलटी झाला. पुण्याहून अंबरनाथ येथे साखरेचा माल घेऊन ट्रक जात असताना तो खंडाळा येथून खोपोली कडे जात असताना तो अमृताजण ब्रिज जवळ आला असता तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने तो भरधाव वेगात आला असून त्याने समोरील अनेक दुचाकी स्वरांना वाचवून चालकाने ट्रक हा रस्त्याला बाजूला नेऊन पलटी केली. यात ट्रकचे आणि साखरेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाने आणि समोरील दुचाकी स्वरांना वाचवले.
मुबंई-पुणे जुन्या महामार्गावर साखरेचा ट्रक पलटी
