खांडसई येथील अंडरआर्म स्पर्धेत सुहास इलेव्हन खवली विजयाचा मानकरी

। पाली /गोमाशी । वार्ताहर ।
प्रशांत भाऊ सोनावणे प्रतिष्ठाण आणि बाप्पा इलेव्हन ठाणे यांच्यावतीने अंडरआर्म षटकार मारीचे सामने 26, 27 फेब्रुवारी रोजी खांडसई येथे आयोजित केले होते. या स्पर्धेत इच्छुक 20 संघाने आपला प्रवेश नोंदविला होता. या स्पर्धेतील अंतिम लढत सुहास इलेव्हन खवली आणि कालभैरव नांदगाव या दोन संघात झाली. या अंतिम सामन्यात खवली या संघ विजयी झाला.
या संघास रोख रक्कम सात हजार रु व आकर्षक चषक, उपविजेता नांदगाव संघ पाच हजार रु व आकर्षक चषक तर तृतीय क्रमांक ठाणे या संघास तीन हजार रु व चषक देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेतील मालिकावीर कृनाल चोरगे, उत्कृष्ट फलंदाज नांदगाव संघाचा राज खैरे,उत्कृष्ट गोलंदाज यश, तर क्षेत्ररक्षक कृष्णा या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण आकाश सोनवणे,पोलीस पाटील महिपत जांभूळकर, निखिल यादव,गोविंद सावंत, प्रतिष्ठाणचे पदाधिकारी ग्रामस्थ मंडळ खांडसई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

Exit mobile version