| सुधागड/पाली | प्रतिनिधी |
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने सुधागड तालुक्यातील उद्धर आणि वऱ्हाड येथे श्री सदस्यांनी वृक्षारोपण केले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, वृक्ष लागवड इत्यादी लोकोपयोगी विविध उपक्रम राबविले जातात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून दरवर्षी श्री सदस्य मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करतात आणि ते वृक्ष मोठे होईपर्यंत आवडीने त्या वृक्षांचे संवर्धन देखील करतात. रविवारी 75 श्री सदस्यांनी उद्धर रामेश्वर मंदिर आणि वऱ्हाड येथे एकूण 136 रोपांची लागवड केली. यामध्ये वड, काजू, आंबा, कडुलिंब, करंज या प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण केल्यावर त्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी वृक्षांच्या सभोवताली गवत साफ करण्यात आले.







