सुहासिनी मढवी यांचे निधन

| अलिबाग | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील रहिवासी सुहासिनी दत्तात्रेय मढवी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवार, दि. 24 एप्रिल रोजी निधन झाले.

निधनसमयी त्या 78 वर्षांच्या होत्या. कै. सुहासिनी मढवी यांना संगीत भजनाची, शेती करण्याची आवड होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंचक्रोशितील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. कै. सुहासिनी मढवी यांच्या पार्थिवावर बेलोशी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्‍चात एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सून असा मोठा परिवार आहे. कै. सुहासिनी मढवी यांचे दिवसकार्य दि. 6 मे रोजी निवासस्थानी होणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

Exit mobile version