| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील मोर्बा येथील 25 वर्षीय विवाहित महिलेने पतीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची खबर सुहेल मुसबहा चौधरी (30) रा. मोर्बा, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
या घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळाली माहिती अशी की, घटनेतील मयत महिला शहीदा सुहेल चौधरी (25) रा. अन्वर सोलकर यांची चाळ, पहिला मजला, रूम नं.1, मोर्बा, ता. माणगाव हिने तिच्या पतीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून तिच्या राहत्या घरातील लोखंडी पाईपला काळ्या रंगाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला उपचाराकरिता माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता येथील डॉक्टरांनी तिला तपासून मयत झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.