माणगावात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील उतेखोलवाडीतील एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. शर्मिला चंद्रकांत उभारे (वय-30) असे मयत महिलेचे नाव आहे.

माणगाव तालुक्यातील उतेखोलवाडीत राहणार्‍या शर्मिला चंद्रकांत उभारे (वय-30) या महिलेने शनिवारी (दि.18) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून जीव दिल्याची घटना घडली. उतेखोलवाडीतील चंद्रकांत शांताराम उभारे (वय-32) यांनी या घटनेबाबत माणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या घटनेत मयत यांनी साडीच्या साहाय्याने हॉलमधील सिलिंग फॅनलला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती मिळताच माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील व माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोह दोडकुलकर हे करीत आहेत.

Exit mobile version