| माणगाव | प्रतिनिधी |
तालुक्यातील पोटणेर गावातील 60 वर्षीय इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी, (दि.20) रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या पूर्वी घडली. या घटनेची माहिती पूजा राजेश निमुणकर (42) रा. पोटणेर ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक अशी की, घटनेतील मयत इसम सुदाम दाजी सावंत (60) रा. पोटणेर ता. माणगाव यांनी आपल्या राहत्या घरी कोणत्या तरी अज्ञात कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती समजताच माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व महिला पोलिस उपनरीक्षक अस्मिता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस नाईक श्री. फडताडे हे करीत आहेत.