15 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

| पुणे | प्रतिनिधी |

एकतर्फी प्रेमातून एक रिक्षाचालक तरुण घराजवळ राहणाऱ्या मुलीस शिकवणीला जात असताना त्रास देत असल्याने तसेच त्याने घरात शिरुन त्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याने 15 वर्षांच्या मुलीने राहते घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्रिशला बंडु कवडे (वय 15) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी सोमनाथ ऊर्फ कोल्ह्या संजय राखपसरे (वय 22, रा. लोहगाव) याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे.

Exit mobile version