। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोलीत राहणार्या अश्विनी कडव (वय 30) या विवाहितेने पतीच्या दारुच्या व्यसनासह इतर गोष्टींना कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकिस आली आहे. या घटनेनंतर कळंबोली पोलिसांनी मृत अश्विनीचा पती नरेंद्र कडव याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत अश्विनी ही मुळची तळोजा एमआयडीसीतील देवीचा पाडा येथे राहणारी असून 2016 मध्ये तिचा विवाह कळंबोली गावात राहणार्या नरेंद्र कडव याच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यानंतर नरेंद्र कडव याने एक-दोन वर्षात अश्विनीच्या वडिलांनी लग्नात दिलेले सोन्याचे सर्व दागिने विकुन मिळालेले पैसे खर्च करुन टाकले. त्यामुळे अश्विनी व नरेंद्र यांच्यात नेहमी वाद विवाद होत होते. त्यामुळे नरेंद्र पत्नी अश्विनीला शारीरीक व मानसिक त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळलेल्या अश्विनीने कळंबोली येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.