अलिबागच्या नाट्यगृहाची बातमी कळली आणि पायाखालची जमीनच सरकली. ज्या रंगमंचामुळे आम्ही कलाकार घडलो, त्याला असं अग्नितांडवात पाहून खूप मोठा धक्का बसलाय. आज ज्या ठिकाणी आहोत तिथे पोहोचण्याचा आत्मविश्वास याच रंगभूमीवर कलाकृती सादर करत निर्माण झाला. पुन्हा अलिबागला गेल्यावर अनेक नवीन गोष्टी याच नाट्यगृहात सादर करायच्या होत्या. पण आता तर, कलाकारांना नेहमीच आपल्याशा वाटणार्या चित्रलेखाताईंनी सर्व कलाकारांसाठी खूप जिद्दीने उभं केलेलं हे स्वप्न असं होरपळताना बघून खूप वाईट वाटतयं. खूप पोरकं झाल्यासारखं वाटतंय.
– ज्योती राऊळ-बावधनकर, अभिनेत्री