चवदार तळ्यात तरुणाची समलिंगी संबधातुन आत्महत्या

I महाड I प्रतिनिधी I
महाड तालुक्यांतील साकडी गावांतील तरुणाने शहरांतील चवदार तळ्या मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असुन या प्रकरणी पोलिसांनी दोनजणांना अटक केली आहे. महाड तालुक्यांतील साकडी गावांतील गणेश दत्ताराम मालुसरे (२२) हा १ जुलै पासुन बेपत्ता होता. कामावर जात असल्याचे सांगुन तो घरातुन निघुन गेला. तो परत आला नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार महाड औद्योगिक वसाहत पोलिसांकडे केली होती.

पोलिसांच्या तपासा मध्ये गणेश याची मोटार सायकल महाड शहरांतील चवदार तळ्याच्या बाजुला सापडली.परंतु गणेशचा तपास लागत नव्हता.अखेर ४ जुलै रोजी पहाटे चवदार तळ्या मध्ये त्याचा मृत देह आढळून आला.अधिक तपासा केल्या नंतर गणेशने आत्महत्या केली असल्याचे उघड झाले.परंतु त्या नंतर या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे.

वडगाव सांगली येथील जिनेश काडापुरे याच्या जवळ गणेश याचे समलिंगी संबध असल्याचे तपासा मध्ये पुढे आले.जिनेश हा विवाहीत असुन गणेश बारोबर आयुष्यभर राहाण्याचा बहाणा करीत त्याने गणेशचे शोषण केले.याला महाड तेरडे वाडी येथील अनिल हिरवे हा देखिल संगनमत करीत असे,त्यांनी गणेशला ब्लॅकमेलिंग करीत त्याच्या सोबत गैर प्रकार केला.या समलिंगी लैगिक शोषणाला वंâटाळून आणि आपली बदनामी होईल या भितीने त्याने चवदार तळ्या मध्ये आत्महत्या केली.या प्रकरणी संदीप शेडगे यांनी तक्रार दाखल केली असुन जिनेश आणि अनिल याचावर गुन्हा दाखल करण्ंयात आला आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेंत.

Exit mobile version