। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील आपटा गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका 18 वर्षीय तरूणीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपटा येथील राहणारी स्वराली दिलीप पाटील (18) या तरूणीने घरातील खोलीमध्ये लोखंडी पाईपला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्वराली पाटीलचे वडील दिलीप पाटील यांनी याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले व सदर तरूणीच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.