लातूरच्या इंग्लिश माध्यमिक स्कूलमधील विद्यार्थ्यांची आत्महत्या

| लातूर | वृत्तसंस्था |

लातूर शहरातील एका नामांकित वस्तीगृहात तेरा वर्षाच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे वस्तीगृहासह शहरात एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, चार दिवसपूर्वी हा विद्यार्थी हॉस्टेलमधून पळून गेला होता. त्यानंतर त्याचा शोध घेत सोमवारी सकाळी त्याला होस्टेलमध्ये आणण्यात आले होते.

या घटनेतील तेरा वर्षीय विद्यार्थी परळी तालुक्यातील पांगरी या गावचा तो रहिवासी आहे. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी त्याला लातूरच्या स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे दाखल केले होते आणि शाळेच्या हॉस्टेलमध्येच तो राहत होता. या होस्टेलमध्ये एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मृत विद्यार्थाचे भविष्य घडवण्यासाठी आई-वडिलांनी त्याच्या मनाविरुद्ध त्याला शाळेत दाखल केले होते. चार दिवसांपूर्वी अरविंद शाळेतून पळून गेला होता. सोमवारी सकाळी मृत विद्यार्थाच्या घरच्यांनी त्याला होस्टेलमध्ये वापस आणले. सोमवारी रात्री त्याने हॉस्टेलच्या बाथरूममध्ये जात स्वेटर ने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मनाविरूद्ध त्याला हॉस्टेलमध्ये दाखल केल्यान त्याच संतांपातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा तर्क लावण्यात येत आहे. तर ही आत्महत्यानसून घातपात आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. या प्रकरणी दोशींवर कडक कारवाई जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ही नातेवाईकांनी घेतली आहे. या वस्तीगृहात अशा पद्धतीची घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. आज या घटनेचा इन कॅमेरा पोस्टमार्टम होणार आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Exit mobile version